लग्नानंतर प्रेम संबंधास नकार देणाऱ्या विवाहितेचा प्रियकराने केला निर्घृण खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
जिल्हातील रामपुरी शिवारातील उसाच्या फडामध्ये घडलेल्या खूनाचा उलगडा झाला असून, विवाहानंतर प्रेमसंबंधात नकार देणाऱ्या महिलेचा तिच्याच पूर्व प्रियकराने अत्यंत शांत डोक्याने खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

जिल्ह्यातील मानवत तालुक्यामध्ये उसाच्या फडामध्ये विवाहित महिलेच्या खूनाची घटना दि. ८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. अवघ्या आठ दिवसांमध्ये तिसऱ्या खुनाच्या घटनेने जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली होती. मानवत तालुक्यामध्ये यापूर्वी दोन खुनाचे घटना घडल्या असून यापैकी एका खुनाच्या घटनेमध्ये मयत महिलेच्या फिर्यादी असणारा पतीच आरोपी निघाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. तर मानवत शहरातील अख्तर नावाच्या तरुणाच्या खुनाचा तपास अजूनही चालू आहे. यातच मानवत तालुक्यातील रामपुरी शिवारात एका उसाच्या फडा मध्ये कुजलेल्या अवस्थेमध्ये विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला होता. यावेळी सदरील महिलेचे मुंडके धडापासून वेगळे आढळून आले होते. शेतमालक यांच्या तक्रारीनंतर मानवत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, याप्रकरणी अवघ्या ४८ तासांमध्ये सदरील खून प्रकरणाचा उलगडा करण्यात आला.

मागील काही दिवसापूर्वी तालुक्यातील रामपुरी शिवारामध्ये ऊस तोडणीसाठी आलेल्या टोळीतील महिला हरवल्याची तक्रार मानवत पोलिसात करण्यात आली होती . हरवलेल्या महिलेचाच तो मृतदेह असल्याचे तपासात निष्पन्न झाले. मृत महिलेच्या मोबाईल फोनची माहिती मिळवल्यानंतर पोलिसांची तपास चक्रे वेगाने फिरले .यावेळी संजय उर्फ पप्पू जोंधळे यास पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता ,मृत महिला व त्याचे विवाहापूर्वी प्रेमसंबंध असल्याचे त्यांनी कबुली दिली . दिवसानंतर तिचा विवाह दुसऱ्याशी झाल्या नंतर तिने प्रेमसंबंधात नकार दिल्याने ,शेवटचे एकदा भेटू ! असे म्हणत मानवत तालुक्यातील रामपुरी शिवारामध्ये ऊस तोडणी चालू असलेल्या एका उसाच्या फडामध्ये बोलून घेत ,नारळ कापण्याच्या कत्तीच्या साह्याने प्रेयसीचा खून केल्याचे त्याने मान्य केले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसाच्या आतच गुन्हा उघडकीस आणण्यात व आरोपी निष्पन्न करण्यात मानवत पोलीस व परभणी स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक रागसुधा आर , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण बा.मोरे, पो.उप.नि किशोर नाईक, पो.उप.नि शिवाजी पवार, पोलीस कर्मचारी सुरेश डोंगरे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, संजय शेळके, अरुण पांचाळ, शंकर गायकवाड, जमीरोद्दिन फारोकी, किशोर चव्हाण, कैलास कुरवारे, युसुफ पठाण, संजय घुगे, छगन सोनवणे सायबर सेलचे स.पो.नि बाचेवाड, पोह बालाजी रेड्डी, राजेश आगाशे यांनी केली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment