कोल्हापूरात अतिक्रमण काढताना पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
अतिक्रमण काढताना पोलीस निरीक्षकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार कोल्हापूर शहरातील शिवाजी चौक परिसरात घडला आहे. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अतिक्रमण काढण्यासाठी केलेल्या वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांना काही लोकांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आहे. तसेच त्यांच्याशी वाद घालत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला आहे. या संबंधित व्यक्ती वरती गुन्हा दाखल करण्याचे काम जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सध्या सुरू आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment