प्रेमविवाह न करण्याच्या शपथ प्रकरणी प्राचार्यांसह तिघांचे निलंबन; विद्यार्थीनी कारवाईच्या विरोधात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महिला कला वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींना प्राध्यापकांनी प्रेम व प्रेमविवाह न करण्याची शपथ दिली होती. ही शपथ १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबीरात टेंभुर्णी येथे दिली होती. या प्रकरणात विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीने प्राचार्यांसह दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. याचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर सोसायटीने एका चौकशी समितीमार्फत चौकशी सुरू झाली असुन समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्राचार्य डॉ. राजेंद्र हावरे, प्रा. प्रदीप दंदे व रासेयो कार्यक्रम अधिकारी कापसे यांना निलंबीत करण्यात आले. तसेच प्राचार्य पदाचा पदभार डॉ. सिमा जगताप यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

यानंतर आज सकाळपासून विद्यार्थीनींनी महाविद्यालयाला कुलूप लावून बाहेर आंदोलनाचा सुरूवात केली आहे. टेंभुर्णी येथील शपथ प्रकरणी करण्यात आलेल्या तीन प्राध्यापकांचे निलंबन जोपर्यंत मागे घेतले जाणार नाही. तोपर्यंत महाविद्यालयातील सर्व तासिकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. त्यामुळे आता महाविद्यालय तसेच संस्थेतर्फे कोणती भूमिका घेतल्या जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment