खबळजनक! पुण्यात महिलेची रुग्णालयाच्या ५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । पुण्यातील केईएम रुग्णालयाच्या ५व्या मजल्यावरून उडी मारून एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. नैराश्यातून या महिलेने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. यासना मुकेश बकसाना (वय 36) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पतीचा तीन महिन्यांपूर्वीच कॅन्सरने मृत्यू झाला. गेल्या ४ वर्षांपासून १३ वर्षांचा मुलगा किडनी आणि मधुमेेह या आजारांनी ग्रस्त आहे. त्यामुळं नैराश्येतून आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मृत यासना मुकेश बकसाना यांच्या १३ वर्षांच्या मुलगा किडनी व मधुमेह या आजारांनी ग्रस्त आहे. त्यामुळे त्याच्यावर रास्ता पेठेतील केईएम रुग्णालयाच्या ५ व्या मजल्यावरील वॉर्ड क्रमांक ६ क्रमांकाच्या खोलीत उपचार सुरू होते. या खोलीच्या खिडकीला ग्रील नव्हते. या महिलेने सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास या खिडकीतून खाली उडी मारून आत्महत्या केली. महिला खाली पडल्यानंतर येथील सुरक्षारक्षकांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या महिलेच्या मुलावर याच विभागात उपचार सुरू असल्याचे समजले. या महिलेकडे सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे.

मृत महिलेच्या पतीचा ३ महिन्यांपूर्वी कॅन्सरच्या आजाराने मृत्यू झाला होता. तसेच, गेल्या चार वर्षांपासून त्यांचा मुलगा किडनी व मधुमेहाच्या आजाराने ग्रासलेला आहे. तो नियमित या रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी येत होता. एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे परिस्थितीसमोर हताश झालेल्या यासना यांनी अखेर आपले जीवन संपवले आहे. या घटनेचा तपास समर्थ पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment