अरे बाप रे ! चोर म्हणून आला आणि नवरदेव बनून गेला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी | चोरीचे अनेक प्रकार आपण पहिले वाचले आणि अनुभवले देखील असतील मात्र हा प्रकार थोडा अजबच आहे. कारण चोर म्हणून आलेला व्यक्ती चक्क नवरदेव बनून गेला आहे. सध्या पोलीस त्याचा तपास करत आहेत.

नागपूर मधील महाल आयचीत मंदिर भागात आकाश मॉल नावाचे दुकान आहे. या दुकानाचे मालक सुमीत अरोरा यांनी ३१ ऑगस्ट रोजी दुकान बंद केले आणि आपल्या घरी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास एक चोरटा कुलरच्या जागेवरून आत शिरला आणि त्याने प्रथम दुकानाच्या गल्ल्यावर हात मारला. त्यानंतर दुकानातील किंमती कपडे एका बॅगमध्ये भरले. त्यानंतर त्याने दुकानाच्या गच्चीवर जाऊन अंघोळ देखील केली. त्यानंतर तो दुकानातून बाहेर पडून रिक्षा पकडून रेल्वे स्टेशनकडे पसार झाला.

सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या दुकानाच्या मालकाला सामान आस्थावेस्थ पडल्याचे पाहून आपल्या दुकानात चोरी झाली आहे हे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली. त्यानंतर हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरेच्या माध्यमातून उघड झालं आहे. या घटनेतील चोर हा रेल्वे स्टेशनवरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे. त्यामुळे तो रेल्वेने पसार झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment