धुळ्यामधे पोलीस कर्मचाऱ्याच्याच घरावर चोरट्यांचा डल्ला , पोलीस स्वतःच नाहीत सुरक्षित ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । धुळे शहर चोरीच्या घटनांनी हादरून गेले आहे . सतत चोरीच्या घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत . संजय दादाभाई ठाकुर रा.लालबहाद्दुर शास्ञी नगर जवळील शर्मा नगरातील प्लॉटनं.26 मध्ये राहत असून ते एस.पी.कार्यालयात लिपीक म्हणून कार्यरत आहे. ते देवपुरातील भगवती नगरात वैयक्तिक कामासाठी गेले असताना , चोरट्यांनी बंद घराचा दाराचा कडीकोंडा तोडुन गोदरेज कपाट फोडुन कपाटातील सोन्यांचे दागिने लुटून पोबारा केला. सोन्याची चेन,नेकलेस सोन्यांचे वळे असा अंदाजे २ ते ३ लाखांचा माल लंपास केला आहे .

Untitled design.png

दरम्यान , पोलीस कर्मचाऱ्याच्याच घरावर चोरट्यांनी हात साफ केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . चोरटे घरांवर पळत ठेऊन चोरी करत आहेत . त्यामुळे नागरिक घर सोडून बाहेर पडण्यास देखील घाबरू लागले आहेत . मिळालेल्या माहिती नुसार , धुळे पोलीस वरिष्ठ अधिकारी देखील स्वतः गस्त घालत आहेत . तरी अशा धाडसी चोऱ्या होताच आहेत . त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे . लवकरात लवकर या चोरट्यांना पकडावे अशी मागणी नागरिक करत आहेत .

Leave a Comment