सैदापूर येथे जादा दराने पेट्रोल, डिझेल विकणाऱ्या पेट्रोल पंपावर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सैदापूर येथील ओगलेवाडी रोडवरती असणाऱ्या पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल जादा दराने विक्री करण्याच्या कारणावरून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सरस्वती हिंदुस्तान पेट्रोलियम पंपाचे विक्रेते, मॅनेजर व मालक यांच्यावर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल आर. एस. जाधव यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांनी कोरोना विषाणू संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून सैदापूर येथील सरस्वती पेट्रोल पंपावर वाढत्या दराने पेट्रोल व डिझेलची विक्री केली जात होती.

तसेच जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर केवळ अत्यावश्यक सेवा बजावत असलेल्या कर्मचारी यांना नियमित योग्य दराने पेट्रोल द्यावे असे सांगितलेले आहे. तरी गुरूवारी दुपारच्या वेळेत पेट्रोल ७८.६४ रूपये असताना ते ८० रुपये दराने व डिझेल ६४.६८ रूपये असताना ७० रुपये दराने विक्री करीत असल्याचे आढळून आले. सदरच्या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांनी भेट दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कांबळे करत आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

मोठी बातमी! गोरगरीब जनता, कामगारांसाठी सरकारची १ लाख ७० हजार कोटींची घोषणा

महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”

धक्कादायक! गेल्या २४ तासात जगभरात २ हजार ३०६ मृत्यू, जाणून घ्या कोणत्या देशात किती रुग्ण ?

एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस

कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या

‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…

सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या

Leave a Comment