वरून दिसायचे मसाज सेंटर आत होते सेक्स रॅकेट ; २४ जणांना पडल्या बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गुरुग्राम ( हरियाणा ) सेक्स रॅकेट चालवण्यासाठी विविध क्लूक्त्या वापरल्याचे आपण रोजच वाचतो. मात्र मसाज सेंटर आता सेक्स रॅकेटचे अड्डे बनत असल्याचे सत्य सातत्याने समोर येते आहे. अशातच एका सेक्स रॅकेटचा पर्दा फाश झाला आहे. हरयाणा राज्यातील गुरुग्राम शहरात या काळ्या कामाला पोलिसांनी उजेडात आणले आहे.

गुरुग्राम येथील टोलेजंग मोलमध्ये एका मसाज सेंटरमध्ये सेक्स रॅकेटचा व्यवसाय सुरु असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी त्यावर पाळत ठेवली आणि मिळालेल्या माहितीची सत्यता तपासली. पोलिसांनी साध्या वेशात चौकशी केली असता. आसपासच्या लोकांनी येथे सेक्स रॅकेट चालत असल्याच्या बाबीला दुजोरा दिला. त्यानंतर पोलिसांनी आपल्यातीलच एकाला येथे ग्राहक बनवून पाठवले. ग्राहक बनून गेलेल्या पोलीसाला खात्री पटताच त्याने त्याच्या टीमला आत बोलावले. छापा टाकताना काही मुली ग्राहकांसोबत विक्षिप्त अवस्थेत आढळल्या. तर काही ग्राहकाची वाट बघत बसल्याच्या आढळल्या.

या प्रकरणात पोलिसांनी एकूण २४ जणांना अटक केली असून यात २ तरुण मुलींचा समावेश आहे. ७ ग्राहक १ मॅनेजर १५ महिला असा अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचा तपशील आहे. शरीरविक्री करणाऱ्या तरुणी या राजस्थान, तमिळनाडू, दिल्ली, मणिपूर, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यातील आहेत. या प्रकरणात पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF

WhatsApp Nambar – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur

तर मी शिवसेनेची हमी घेतो : रावसाहेब दानवे

पूराने केलेला विध्वंस बघून भिडे गुरुजींना आले रडू

पूरग्रस्तांच्या सेवेसाठी शिवसेनेने पाठवले १०० डॉक्टर

महाराष्ट्र भाजपच्या लोकप्रतिनिधींनी १ महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना द्यावे : चंद्रकांत पाटील

पूरग्रस्तांना धमकी द्यायला चंद्रकांत पाटील हे जनरल डायर आहेत का : राष्ट्रवादी

राहुल गांधीनी दिली त्यांच्या मतदारसंघातील पूरग्रस्तांना भेट

पूरग्रस्तांसाठी संभाजीराजे करणार ५ कोटींची मदत

Leave a Comment