जर सरकारने काहीच चुकीचे केलेले नाही, तर मीडियावाल्यांची अडवणूक का ?? संजय राऊतांचा संतप्त सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका मुलीवर सामहिक बलात्कार झाल्याने सर्वच स्तरातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी देशभरातुन निषेध व्यक्त होत आहे. याशिवाय, या प्रकरणी इतर राजकीय पक्षांनी योगी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. येथील स्थानिक पोलिसांच्या कार्यशैलीवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा योगी सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेश सरकारने काहीच केले नाही तर, माध्यमांना तिथे जाण्यापासून का रोखले जात आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.

“मला कळत नाही का माध्यमांना अडवण्यात आले आहे. जर सरकारने काहीच चुकीचे केलेले नाही, तर या प्रकरणातील तथ्यं बाहेर काढण्यासाठी माध्यमांना त्या ठिकाणी जाऊ दिले पाहिजे.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

या अगोदर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्कीचा देखील संजय राऊत यांनी निषेध केला आहे. राहुल गांधींना धक्काबुक्की करणे म्हणजे या देशातील लोकशाहीचा बलात्कार आहे असं संजय राऊत म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment