धक्कादायक! पोलीस चौकीसमोरच एकमेकांवर कोयत्याने वार; सातार्‍यात खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा येथे आज सकाळी तालुका पोलीस स्टेशनसमोर थरकाप उडवणारी घटना घडली आहे. इथे आज दोघांनी एकमेकांवर कोयत्याने वार केल्याचे समोर आले आहे. सकाळी ११ वाजता घडलेल्या या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अशी माहिती मिळाली आहे. हा हल्ला पोलिसांच्या समोरच घडल्याचे निदर्शनास आले आहे.

सुरेश दुबळे आणि रामा दुबळे असे या दोघांचे नाव आहे. तसेच हे दोघेही सैदापूर येथील आहेत. या दोघांमध्ये सैदापूर येथे वाद झाला होता. म्हणूनच ते पोलीस ठाण्यात आले होते. येथे सुद्धा दोघांमध्ये वाद झाल्याने हा प्रकार घडला आहे. पोलीस ठाण्याच्या समोर दोघांमध्ये खुन्नस झाली आणि सुरेश दुबळे याने आपल्याजवळील कोयत्याने रामा दुबळे यांच्यावर हल्ला केला. त्याच कोयत्याने रामा दुबळे यांनी सुरेश दुबळे यांच्यावर हल्ला केला अशी माहिती मिळाली आहे. दोघांमधील परस्पर जुन्या वादातून ही घटना घडली आहे.

दरम्यान थेट पोलिस ठाण्यात हल्ला झाल्याने पोलिसांची धावाधाव उडाली. दोघे गंभीर जखमी झाले असून सिव्हिल रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरूआ हेत. ही घटना समजताच सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी धाव घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. सर्वत्र कोरोना फैलावाचे वातावरण आहे. त्यात ही घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment