खासदार जयसिद्धेश्वर महाराजांचा जातीचा दाखला हरवला; पोलिसांत तक्रार दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच जात प्रमाणपत्र हरवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांनी प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवल्याची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जात वैधता पडताळणी समितीने दाखला अवैध असल्याचा निर्णय देण्याआधीच पोलिसात तक्रार झाल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांचा जातीचा दाखला 9 तारखेला प्रवासादरम्यान दाखला हरवला आहे असा अर्ज 14 तारखेला पोलिसात खासदारांच्या नावाने करण्यात आलाय. विशेष म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी या जात प्रमाणपत्राबाबत अंतिम सुनावणी पार पडली. त्यावेळी दाखला उच्च न्यायालयात असल्याची माहिती खासदारांच्या वकिलांनी दिली होती.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment