जन्मदात्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत मुलाने केला निर्घृण खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । जिल्हयातील खटाव तालुक्यातील मोराळे गावात मुलाने आपल्या जन्मदात्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. किरण शहाजी शिंदे असं वडूज पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी मुलाचं नाव आहे. तर कांताबाई शहाजी शिंदे असं मयत महिलेचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे. एका क्षुल्लक कारणावरून मुलगा किरण याने आपली आई कांताबाई हिच्याशी वाद घालत हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, मागच्या मुलांची लग्ने झाली माझ लग्न का करत नाही असं म्हणत आरोपी किरण आपल्या आईला शिवीगाळ करत होता. यावादातून आपल्या राहत्या घरी दाराला आतून कडी लावून किरणने आई कांताबाईच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. यात कांताबाईचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना ही याबाबत माहिती मिळताच त्यांनी तत्काळ आरोपी किरणला ताब्यात घेतलं. याघटनेनंतर या परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास वडूज पोलीस करत आहेत.

Leave a Comment