महसूल विभागातील कर्मचाऱ्याचा मुलगा वाळू तस्करीच्या प्रकरणात फरार; 40 लाखांची वाळू जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी |

अवैद्य वाळू माफियांच्या वर उंब्रज पोलिसांची धडक कारवाई करत मसूर व वाण्याचीवाडी मधून 40 लाख 51 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यावेळी १ जणाला अटक करण्यात आली आहे. संबंधीत बेकायदा वाळु उपसा प्रकरणात कराड महसुल विभागातील कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याने प्रशासकिय स्थरावर हे प्रकरण दडपणयाचे प्रयत्न सुरु असुन जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालणेची मागणी नागरिकांमधुन होत आहे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाण्याची वाडी ता. कराड येथील सार्वजनिक ओढ्याच्या पात्रात दहा तारखेला मध्यरात्री 12 वाजता अवैद्य वाळूचे चोरून उत्खनन सुरू असल्याचे नियुक्त पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार केलेल्या कारवाईत वाळू उपसा करत असलेले दोन जण दिसून आले. नियुक्त पथकाने त्यांच्याकडे विचारणा केले असता एक जण पळून गेला तर दुसऱ्याला जागेवरच पकडला असून त्याचे नाव तुषार वसंत यादव वय.27 व मुळगाव काले असून सध्या संतोषी माता नगर मसूर येथे राहत असल्याचे सांगितले.

सदर वाळू तस्करांकडून 40 लाख 51 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल तीन ब्रास वाळू आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईत तुषार यादव व अमित चंद्रकांत पारवे यांचे विरुद्ध कोणत्याही शासकीय परवान्याशिवाय चोरून वाळू उत्खनन करणे आणि चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून तुषार यादव यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मयेकर करीत आहेत.

तसेच अकरा तारखेला रात्री दोन वाजता मसूर येथे चिखली रोडवर विनोद कांबिरे राहणार कांदेवाडी आणि आकाश अधिकराव चव्हाण राहणार चिखली हे नंबर प्लेट नसलेल्या ट्रॅक्टर डम्पिंग मधून वाळूची वाहतूक करीत असताना पकडले. त्यांना विचारपूस करीत असताना ट्रॅक्टर चालक विनोद कांबिरे हा वाळू सह ट्रॅक्टर घेऊन पळून गेला. त्याच्यावर वाळूचोरी व शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी आकाश चव्हाण यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव करीत आहेत.

वरील दोन्ही ठिकाणची कारवाई उंब्रचे पोलीस निरीक्षक व प्रभारी अधिकारी अजय गोरड यांना गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार नियुक्त पथकाने कारवाई केली आहे. पथकातील सहाय्यक फौजदार गणेश भोसले, हवालदार राजेंद्र साळुंके, कॉन्स्टेबल दत्तात्रय लवटे, अभिजीत पाटील ,अनिल देशमुख, अमोल निकम स्वप्नील मोरे यांचा कारवाईत सहभाग होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment