हाथरसच्या ‘निर्भया’चा मृत्यू झाला नाही, तिला मारले गेले – सोनिया गांधीचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला मारले गेले आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे.तसेच मुलगी असणं गुन्हा आहे का?? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. “हाथरसमध्ये निर्दोष मुलीबरोबर जो अत्याचार झाला तो आपल्या समाजावर कलंक आहे. हाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला मारले गेले आहे – एक निष्ठुर सरकारद्वारे, त्या सरकारच्या प्रशासनाद्वारे व उत्तर प्रदेश सरकारच्या उपेक्षेद्वारे.” अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हाथरस येथील सामूहिक बलात्कारच्या घटनेवर मत व्यक्त केले आहे.

मी विचारू इच्छिते की, मुलगी होणं गुन्हा आहे का? गरिबाची मुलगी असणं अपराध आहे का? उत्तर प्रदेश सरकार काय करत होते. संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला. वेळीच मुलीला योग्य उपचार नाही दिला गेला. आज एक मुलगी आपल्यातून गेली आहे. मी सांगू इच्छिते की हाथरसच्या निर्भयाचा मृत्यू झाला नाही. तिला मारले गेले आहे. अस सोनिया गांधी यांनी म्हणले.

उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सर्वण समाजातील चौघांनी सामूहिक बलात्कार केला होता. दोन आठवड्यापूर्वी ही घटना घडली होती. आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. चार तरुणांनी बलात्कार करुन तरुणीची जीभ कापून, तिची मान मोडण्याचं अमानुष कृत्य केलं होतं. या घटनेवर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment