राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती- गृहमंत्री अनिल देशमुख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । महाविकास आघाडीच्या गृहविभागाने पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने मेगा पोलीस भरती करण्याचे सूतोवाच केलं आहे. गृह विभाग लवकरच ७ ते ८ हजार पदांवर पोलीस भरती करणार आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. दिवंगत जे.डी. पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार पावले उचलणार आहे. अवैध सावकारी, नक्षलवादाला आळा घालण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परिक्षांसाठी ग्रामीण भागातील तरुणांनी अभ्यासात सातत्य ठेवत तयारी करायला हवी असे मतही त्यांनी व्यक्त केले. राज्यातील महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शासन पावले उचलणार आहे.

Leave a Comment