धक्कादायक! ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षणाचा सुरू आहे. कराड तालुक्यातील ओंड येथे दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनीकडे ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने तिने गळफास घेऊन जीवन संपवले. या धक्कादायक घटनेने कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, साक्षी आबासो पोळ ( रा.ओंड ता.कराड जि.सातारा. वय 15 ) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ओंड येथील पोळ कुटूंबाची परिस्थिती हालाखीची आहे. साक्षी पोळ ही इयत्ता दहावीत शिक्षण घेते. साक्षीचे वडिल आबासो बाळकू पोळ  यांचा 2007 साली मृत्यू झाला आहे. वडिलांचे छत्र हरपल्यापासून आई स्वाती पोळ या साक्षी व तिच्या भावासह कष्ट करून उदरनिर्वाह करतात. कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. शाळांचे शिक्षक हे ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.साक्षीकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल नव्हता. त्यामुळे ती नैराश्यात होती.

मोबाईल नसल्याने तिला अभ्यास करता येत नव्हता. मंगळवारी दुपारी आई कामानिमित्त बाहेर गेली असताना साक्षीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. कराड ग्रामीण पोलीस  घटनास्थळी भेट देऊन चौकशी करत आहेत.

Leave a Comment