स्टेट बँकेच्या एटीएमला आग लावल्याचा सीसीटीव्ही फुटेजवरून खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे 

परभणी येथे दोन दिवसापूर्वी राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएमला आग लागल्याची घटना घडली होती. ही आग अज्ञात व्यक्तीने लावल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे, त्यामुळे या प्रकरणांमध्ये आता नवीन खुलासा झाला असून या खुलाशाने जिल्हाभर खळबळ उडाली आहे.

३ डिसेंबरला मध्यरात्री, शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम आणि सीडीएमए मशीनला आग लागल्याची घटना घडली होती. परभणी शहरातील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारती समोर, ही घटना घडली. ज्यात एटीएम मशीन आणि सीडीएम मशीन जळून खाक झाली होती. या प्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांकडून पोलिसात तक्रारही देण्यात आली होती.

परंतु आता या प्रकरणांमध्ये नवीन खुलासा समोर आला असून, याठिकाणी अज्ञात व्यक्तीने, ज्वलनशील पदार्थ टाकून हे एटीएम पेटवून दिल्याचा सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट दिसत आहे, चेहऱ्यावरती रुमाल बांधून जीन्स पॅन्ट व काळा कोट घातलेली एक व्यक्ती मोटरसायकलवरून एटीएम समोर येऊन थांबली. त्यानंतर स्वतःच्या हातामध्ये आणलेल्या कॅनमधून एटीएममध्ये ज्वलनशील पदार्थ टाकल्यानंतर आगपेटी लावल्याचे दृश्य दिसत आहे. या प्रकरणाला नवीन कलाटणी मिळाली असून, पोलिसांनी आता त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली आहे. त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याच काम सुरू

Leave a Comment