धक्कादायक! रेशन भेटलं नाही म्हणून एकानं केली आत्महत्या; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, एकाला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । रेशन घेण्यावरून दुकानदारासोबत बाचाबाची झाल्यानंतर एकाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना सोयगांव तालुक्यातील पहुरी येथे घडली. याप्रकरणी दुकानदारासह पाच जणांविरुद्ध सोयगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नाना रामराव माताडे असे आत्महत्त्या करणाऱ्या इसमाचे नांव आहे. दि ५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पहुरी येथील राशन दुकानदार ज्ञानेश्वर अप्पा गोराडे इतरांना राशन देत असतांना नांना माताडे तेथे गेले. राशन घेण्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली त्यात दुकानदाराने नाना यांस मारहाण केली. त्यानंतर नानाने आपल्या राहत्या घराच्या मागे जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. अत्यावस्थ परिस्थितीत नाना यांना सुरुवातीला पाचोरा येथे व नंतर जळगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान रविवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला.

याप्रकरणी मृतक नाना रामराव माताडे यांचा मुलगा कृष्णा नाना माताडे वय २७ याच्या फिर्यादीवरून रेशन दुकानदार ज्ञानेश्वर अप्पा गोराडे, धनराज अप्पा गोराडे, प्रमोद अप्पा गोराडे, रमेश अप्पा गोराडे, सोमाजी रामा राकडे सर्व रा.पहुरी यांच्या विरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, जमादार दिलीप तडवी आदी तपास करीत आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment