प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी ‘तो’ करत होता चक्क घरफोड्या; पोलिसांनी प्रेमवीराला ठोकल्या बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रेयसीला खुश करण्यासाठी घरफोड्या करणार्‍या प्रेमवीराला इस्लामपूर पोलिसांनी रविवारी पहाटे पाठलाग करीत रंगेहाथ पकडले. कामेरी येथून घरफोडी करुन मोटरसायकलवरुन पळून निघालेल्या चोरट्याला इस्लामपूर पोलिसांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले. कुणाल संजय शिर्के असे या प्रेमवीर सराईत चोरट्यांचे नाव आहे. त्याच्याकडून ८२ हजारांची रोकड जप्त केली आहे. त्याने शहरातील अनेक घरफोड्यांची कबूली दिली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करू असे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितले.

सविस्तर माहितीनुसार, किरण मस्के व अलमगीर लतीफ हे रविवारी पहाटे अडीच वाजता शहरात पेट्रोलिंग करीत होते. ते कोल्हापूर नाक्यावर आले तेंव्हा मोटरसायकलवरुन एक तरुण वाघवाडीकडून शहरात सुसाट येत होता. त्याला पोलीसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो न थांबताच पेठ-सांगली रस्त्यावरुन आष्टयाच्या दिशेने निघून गेला. पोलीसांनी त्याचा पाठलाग सुरु केला. तेंव्हा तो सावकार काँलनीतून शहरात जाण्याचा प्रयन्त करत असताना स्टेट बँकेजवळ त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलीसांनी त्याच्या जवळील बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये ८२ हजार रुपयांची रोकड व घरफोडीचे साहित्य मिळाले. कामेरी येथून घरफोडी करुन आल्याची कबुली त्याने पोलीसांना दिली.

इस्लामपूर शहरात अनेक घरफोड्या केल्याचेही त्याने कबुली दिली आहे. एका तरुणीच्या प्रेमात पडलेल्या कुणालने तिच्यासाठी अनेक चोर्‍या केल्या आहेत. चोरी करून तो तिला मुद्देमालासह सेल्फी काढून मोबाईलवर फोटो टाकत होता. तसेच दागिणे व किंमती नजराने तिला देत होता. यामुळे ती तरुणीही आता पोलिसांच्या रडारवर आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment