३० हजाराची लाच घेताना दोन पोलीस कर्मचारी रंगेहात अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | तीन हायवावर कारवाई न करण्यासाठी 30 हजाराची लाच स्विकारताना औरंगाबाद ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील दोन कर्मचऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सावंगीबायपास वरील चौफुलीवर अटक केली. रामेश्वर कैलास चेडेकर आणि अनिल रघुनाथ जायभाय अशी लाच घेणाऱ्या पोलिसांची नावे आहेत.

गेल्या १६ मार्च रोजी चिकलठाणा फुलंब्री हद्दीत डब्बर वाहतूकीच्या तीन हायवा ट्रकवर कारवाई न करण्यासाठी ३०हजार रु महिना ठरवण्यात आला होता.  दरम्यान फिर्यादीने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर त्याची भणक आरोपींना लागण्याची शक्यता वरिष्ठ सुत्रांनी वर्तवली आहे. तसेच आरोपींचे सीडीआर तपासल्यानंतर यामधे वरिष्ठ अधिकार्‍याच्या नावाचा उल्लेख आहे की नाही हे पुराव्यानिशी सिध्द होईल.

दरम्यान पैशांची मागणी आणि पंचा समोर लाच स्वीकारली  यामुळे आरोपीविरुध्द सबळ पुरावे उपलब्ध आहेत अशी माहिती सुत्रांनी दिली.या प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.वरील कारवाईत पोलिस निरीक्षक संदीप राजपूत सह हवलंदार गणेश पंडुरे यांनी सहभाग नोंदवला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment