सेट टॉप बॉक्स रिचार्जच्या कारणाने ‘तो’ घरात शिरला; डेंटिस्ट महिलेचा गळा चिरून पसार झाला

लखनऊ । सेट टॉप बॉक्स रिचार्ज करण्याचे कारण सांगून घरी आलेल्या व्यक्तीने पेशाने डेंटिस्ट असलेल्या महिलेची हत्या केली आहे. डॉ. निशा सिंघल असं या महिलेचं नाव असून डॉ. सिंघल यांची सुरीने गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे हत्येच्या वेळी सिंघल यांची दोन लहानगी मुलं शेजारच्या खोलीत होती. त्यांच्या ८ आणि ४ वर्षांच्या मुलांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र सुदैवाने ती बचावली. उत्तर प्रदेशात दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे.

निशा यांचे पती डॉ. अजय सिंघल हे सर्जन आहेत. हल्ल्याच्या वेळी ती हॉस्पिटलमध्ये ड्युटी करत होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घरी आले. हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीला घेऊन ते हॉस्पिटलला आले, मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. सीसीटीव्ही फूटेजच्या सहाय्याने पोलिसांनी शुभम पाठक नावाच्या तरुणाला शनिवारी सकाळी अटक केली. शुभमच्या बाईकचा पाठलाग करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

पाठलाग करताना आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला, प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. केबल टीव्ही तंत्रज्ञ असल्याची बतावणी करणारा शुभम चोरीच्या उद्देशाने घरात घुसल्याची माहिती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार डॉ. सिंघल यांच्या हत्येनंतर तासभर तो त्यांच्या घरात होता. (Agra Dentist Dr Nisha Singhal Murder at home by man who entered on pretext of Set top box recharge)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : http://www.hellomaharashtra.in

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook