उत्तरप्रदेशमध्ये एका टीव्ही पत्रकाराची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ । उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील फेफना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी संध्याकाळी टीव्ही पत्रकार रतन कुमार सिंह (वय ४२) यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. बलिया जिल्ह्यात एका टीव्ही पत्रकाराची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी एका मुलानं रतन सिंह यांना बोलावून घेतले. तेथे काही जणांनी रतन सिंह यांना लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. या घटनेचा पत्रकारितेशी काहीही संबंध नाही. वैयक्तिक कारणातून ही हत्या झाल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. बलियाचे पोलीस अधीक्षक देवेंद्रनाथ यांनी सांगितले की, ‘वाद झाल्यानंतर काही जणांनी पत्रकार रतन सिंह यांची गोळ्या झाडून हत्या केली. पोलीस पथक या घटनेचा तपास करत आहेत.’ पत्रकाराची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दुसरीकडे, रतन सिंह यांच्या हत्येनंतर पत्रकारांनी कुटुंबीयांसह धरणे धरले आहेत. एनएच ३१ वर त्यांनी धरणे धरले. फेफना पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तर पोलीस ठाण्याचे प्रमुख शशिमौली पांडेय यांना पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे.आझमगढचे पोलीस महानिरीक्षक सुभाषचंद्र दुबे यांनी सांगितले की, या प्रकरणात तीन प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. रतन सिंह हे पत्रकार होते. मात्र, या घटनेचा पत्रकारितेशी काहीही संबंध नाही. जमिनीच्या वादातून ही घटना घडली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment