वा रे पट्ठ्या! तडीपारीच्या नोटीसला बहाद्दरानं दिलं पोलिसांना तब्बल १ हजार पानांचं उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोरेगाव प्रकरणानंतर कोल्हापूरात उसळलेल्या दंगलीला जबाबदार धरत वंचित आघाडीचे प्रवक्ते अनिल म्हमाणे याना दोन वर्षांच्या हद्दपारीची नोटीस कोल्हापूर पोलिसांकडून बजावण्यात आली. व्यवसायाने प्रकाशक असलेल्या म्हमाणे यांनी या नोटीसीला उत्तर देण्यासाठी नामवंत लेखकांची प्रकाशित केलेली १ हजार पुस्तके घेऊन पोलिसांत हजर झाले. सोबतच १ हजार पांनाच लेखी उत्तर देखील पोलीस अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं.

माजी गृहमंत्री आर आर पाटील, मंत्री भाई वैद्य, मंत्री सतेज पाटील, IPS विश्वास नांगरे पाटील आशा गृहविभागाच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांनी तसेच हमीद दाभोळकर पासून भारत पाटणकर यांच्या सारख्या ज्येष्ठ विचारवंतांना घेऊन अनेक कार्यक्रम राबवले असताना माझ्यावर हद्दपारीचा प्रस्ताव कोणत्या अनुषंगाने ठेवला गेला असा सवाल यावेळी म्हमाणे यांनी पोलिसांना केला.

आपल्यावर कोणतेही गंभीर स्वरूपाचे गुन्हे नसताना ठेवलेला प्रस्ताव फेटाळण्याची मागणी त्यांनी केली. सरकारकडून हे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले जात असताना दुसऱ्या बाजूला याच गुन्ह्यासाठी हद्दपार करण्यात येत असल्याने सरकारच्या भूमिकेबाबत संभ्रम असल्याची टीकाही त्यांनी केली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment