बबनराव लोणीकरांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना प्रतिनिधी । जालन्यातील परतुरचे भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यातील सेवली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वायरल विडिओ मधील भाषणाच्या आधारावर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“मी पैसे वाटप केले आहेत. त्यामुळे मीच जास्तीच्या लीडने निवडून येणार आहे”, असा उल्लेख असलेलया एका भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोणीकर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र लोणीकरांनी आपल्यावर होत असलेला आरोप फेटाळला आहे.

याबाबत खुलासा करताना लोणीकर म्हणाले की,” मी माझ्या भाषणात पैसे दिल्याचा जो उल्लेख आहे, तर तो मी विकास कामांसाठी जे पैसे दिलेत त्यासंबंधीचा आहे.’ त्यामुळे या आरोपात काही तथ्य नसल्याचे लोणीकरांनी सांगितले. लोणीकर यांच्या पैसे वाटण्याच्या कथित याप्रकरणी सेवली पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment