वाडा-भिवंडी रोडवर अपघातांचे सत्र सुरूच, दोन दिवसात खड्डयाचा दुसरा बळी

ठाणे प्रतिनिधी। वाडा-भिवंडी रोडवर पुन्हा भीषण अपघात झालाय. खड्डा चुकवायला गेलेल्या ट्रकने ६० वर्षीय पादचाऱ्याला उडवल. कुडूस इथं ही घटना घडली. या नागरिकाला वेळेवर उपचार न मिळाल्यान त्याचा मृत्यू झाला. रामप्रसाद गोस्वामी असं या मृताच नाव असून तो मुसारणे येथील एका कंपनीत सुरक्षारक्षक  म्हणून कार्यरत होता. तो मूळचा बिहार येथील असून वाडा तालुक्यतील कुडूस येथे राहत होता.

याआधी एक दिवसापूर्वी याच रस्त्यावर रात्री दहाच्या सुमारास खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात ट्रकखाली सापडून एका डॉक्टर तरुणीचा बळी गेला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रात्रीच टोलनाका बंद पाडला. तसच गुरुवारी सकाळी कुडूस येथे रास्ता रोको आंदोलन केल.

डॉ. नेहा आलमगीर शेख अस या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीच नाव आहे. येत्या ८ नोव्हेंबर रोजी तिच लग्न निश्चित झाल होत. लग्नानिमित्त ती खरेदीसाठी ठाणे येथे आपल्या शाबान शेख या भावासोबत गेली होती. ती रात्री दुचाकीवरून घरी परतत होती. दुचाकी तिचा चुलत भाऊ चालवत होता. व नेहा मागे बसली होती. ते दुगाड फाटा येथे आले असता येथील खड्ड्यामध्ये गाडी आदळल्यान ती खाली पडली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकखाली सापडल्यान तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक गाडी सोडून पसार झाल होता.

इतर काही बातम्या- 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com