गायरानात चरणाऱ्या उंटावर कुऱ्हाडीने वार करत हत्या; दोघांविरोधात गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी। सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे, पाल टाकून राहणाऱ्या भटक्या कुटुंबाच्या मालकीच्या, उंटाची निघृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातच राहणाऱ्या पारधी समाजाच्या दोन इसमांनी हे घृणास्पद कृत्य केलं आहे. याप्रकरणी दोन आरोपीविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर हे आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

जालना जिल्ह्यातून माळेगावकडे निघालेल्या उंटाच्या कळपातील, एका उंटावर कुर्‍हाडीने वार करून त्याला ठार करण्याची  हृदयद्रावक घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे घडली आहे. या उंटाचे मारेकरी फरार झाले आहेत. माळेगाव यात्रेसाठी जालना जिल्ह्यातील गुलाब समीनदर हे आपल्या मालकीच्या पाच उंटासह निघाले असताना, ते रस्त्यामध्ये सोनपेठ परिसरातील शेळगाव येथे मुक्कामी थांबले होते. त्यांच्या बाजूच्या गायरान जमिनीत उंट चरत असताना, त्या ठिकाणी येऊन गावातील दोघे आले आणि ‘उंट गायरानात का चारतो आहे?असं विचारत उंटाच्या पाठीवर कुर्‍हाडीने हल्ला केला.

या घटनेनंतर जखमी झालेल्या उंटावर शेळगाव येथे उपचार करण्यात आले. परंतु उपचाराला प्रतिसाद न दिल्याने, शेवटी उंटाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपस कारण्यात येत आहे.

Leave a Comment