सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातील साक्षीदारांच्या जीवाला धोका; नातेवाईकांचा खळबळजनक दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणाच्या तपासाला वेग आला. दरदिवशी नवे खुलासे होत असतांना सुशांतच्या नातेवाईकांकडून आणखी एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. भाजप आमदार आणि सुशांतचे नातेवाईक असणाऱ्या निरज सिंह बब्लू यांनीसुशांतच्या आत्महत्या प्रकरणातील साक्षीदारांच्या जीवाला धोका असल्याचा दावा मंगळवारी केला.

मुंबई पोलिसांकडून साक्षीदारांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण दिलं जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवाय साक्षीदारांची हत्या होण्याची भीती व्यक्त करत बब्लू यांनी त्यांना तातडीनं संरक्षण देण्याची मागणी केली आहे. १३ ऑगस्टला सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणीचा तपास आपल्याकडे देण्याची मागणी केली. शिवाय या प्रकरणामध्ये आर्थिक गोष्टींचा तपास करण्यासाठी ईडीचा तपास सुरु ठेवण्याची विनंती सुद्धा सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आता यापुढं नेमकं कोणतं वळण मिळणार याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

साधारण २ महिन्यांपूर्वी सुशांत सिंह राजपूत यानं मुंबईतील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. नैराश्यामुळं त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. पण, त्यानंतर आधी समाज माध्यमात आणि नंतर प्रसार माध्यमांमार्गे राजकीय नेत्याकडून सुशांतच्या आत्महत्याप्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह तयार केलं गेलं. यानंतर अनेक अनुत्तरित प्रश्नांनी डोकं वर काढलं आणि यामध्ये अनेक धागेदोरे, व्यक्ती जोडल्या जात आहेत. मात्र, अजूनही याप्रकरणाच्या तपासात ठोस काही हाती लागेलेलं नाहीये.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment