घराच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | फ्लॅटचे बांधकाम सुरू असताना शेजाऱ्यांकडून सतत येणाऱ्या व्यत्ययाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली आहे. ही घटना बाबा पेट्रोल पंम्प जवळील म्हाडा कॉलनी येथे घडली. उषा विजय गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे. ओढणीच्या सहाय्याने या महिलेने गळफास घेतला.

एक वर्षापासून गायकवाड यांच्या फ्लॅटचे बांधकाम सुरु आहे. त्यांना जवळच राहणारे काही जण बांधकामावरुन सतत जाब विचारत. त्यांना मानसिक त्रास देत होते. गायकवाड यांनी अनेकदा बांधकाम विषयी शेजाऱ्यांची समजूत घालण्याचेही प्रयत्न केले. उषा गायकवाड यांनी सतत होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या घरी छताच्या फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत 7-8 जणांची नाव लिहून ठेवली आहेत.

घटनेची माहिती क्रांतिचौक पोलीस ठाण्यात कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यापूर्वी नातेवाईकांनी बेशुद्धावस्थेत महिलेला घाटीत नेल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपनिरीक्षक संदीप शिंदे करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment