चंद्रपूर जिल्हयात जुन्या वादातून तरुणानं केली ६० वर्षीय वृद्धाची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर प्रतिनिधी । जुन्या वादातून युवकाने एका ६० वर्षीय वृद्धावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.  शहरातील  भिवापूर वॉर्डातील माता नगरात रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जोगिंदरसिंग टाक असे मृतकाचे नाव असून अक्षय मुळे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

याबातत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृतक जोगिंदरसिंग टॉक (६०) आणि आरोपी अक्षय मुळे हे दोघेही जवळजवळच राहतात. अक्षय मुळे हा ऑटोचालक आहे. तर जोगिंदरसिंग हे मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करत होते. या दोघांमध्ये मागील काही वर्षांपासून सातत्याने किरकोळ वाद होत होता. सोमवारी पुन्हा दोघांमध्ये असाच एक वाद झाला.

या वादात रागाच्या भरात अक्षयने लोखंडी रॉडने जोगिंदरसिंगच्या डोक्यावर वार केले. यात जोगिंदरसिंग गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून अक्षय मुळे याला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

Leave a Comment