Wednesday, February 8, 2023

अज्ञातावर गुन्हा : राहत्या घरातून रोख रक्कम व मोबाईलसह 38 हजारांचा मुद्देमाल लंपास

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सुमंगलनगर कार्वे नाका येथून राहत्या घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 38 हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना मागील आठवड्यात घडली. याबाबतची फिर्याद अरबान हुसेन शिकलगार (रा. सुमंगलनगर कार्वेनाका, ता. कराड, मूळ रा. काळेवाडी, ता. मोहळ, जि. सोलापूर) यांनी शहर पोलिसात दिली असून याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मागील आठवड्यात अरबान हे घरात झोपले असताना त्यानी त्यांचा मोबाईल, एअर कड बाजूला ठेवले होते. पहाटे झोपेतून उठले तेव्हा मोबाईल व एअर कड त्याठिकाणी दिसले नाही. त्यावेळी त्यांना हॉलचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी उठून घरातील व्यक्तींना उठवून माझा मोबाईल व एअर कड कुठे आहेत असे विचारले असता त्यांनी आम्हाला काही माहिती नाही असे म्हणाल्यावर मावशी शबाना हिने किचनमध्ये जावून पाहिले असता किचनमध्ये ठेवलेल्या पर्सची चेन उघडी होती.

पर्समधील 10 हजार 500 रूपये गायब होते. तसेच अरबाजचा 25 हजार रूपये किमतीचा मोबाईल, 2 हजार 500 रूपये किमतीचा एअर कड असा सुमारे 38 हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत कराड शहर पोलिसात शिकलगार यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.