नक्षलवाद्यांचा खात्मा करायला तैनात असलेल्या CRPF जवानाचा आपल्याच सहकार्‍यांवर अंधाधुंद गोळीबार; 3 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : छत्तीसगड जिल्ह्यातील नक्षलप्रभावीत मराईगुडा येथील लिंगानापल्ली कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने सहकारी जवानांवर गोळीबार केला आहे. या घटनेत तीन जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जवान गंभीर जखमी झाले आहे. जखमी जवानांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मरईगुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लिगम पल्ली सीआरपीएफ 50 बटालियन कॅम्पमध्ये ही घटना घडली आहे.

रितेश रंजन या जवानानं मध्यरात्री 3 वाजून 25 वाजण्याच्या सुमारास आपल्या सहकारी जवानांवर गोळीबार केला आहे. या घटनेत 3 जवानांचा मृत्यू तर 4 जवान जखमी झाले आहेत. या जखमी जवानांवर तात्काळ भद्राचलम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेत धनजी, राजीब मोंडल,राजमणी कुमार यादव या जवानांचा मृत्यू झाला आहे तर धनंजय केआर सिंह,धर्मेंद्र के.आर,धर्मात्मा कुमार,बग मलाया रंजन महाराणा हे जवान जखमी झाले आहेत.

Leave a Comment