Cryptocurrency Price: Elon Musk च्या आवडत्या Dogecoin ची किंमत वाढली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी मार्केट आज, मंगळवार, एकूणच ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करत आहे. सकाळी 9:13 पर्यंत, जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप 0.55% ने वाढून $2.17 ट्रिलियन झाले आहे. मोठ्या कॉईन्सबद्दल बोलायचे झाल्यास, डॉजकॉइनने सुमारे 3 टक्क्यांनी झेप घेतली आहे. काही कॉईन्स घसरले आहेत तर काहींनी उसळी घेतली आहे.

Coinmarketcap कडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी बातमी लिहिताना, Bitcoin 1.13% वाढून $46,639.36 वर ट्रेड करत होता, तर दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या कॉईन Ethereum ची किंमत किंचित वाढली आहे. गेल्या 24 तासात ते 0.73% वाढून $3,526.96 वर पोहोचले. आज Bitcoin चे मार्केट वर्चस्व 41% पर्यंत घसरले आहे, तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 19.5% आहे.

कोणत्या कॉईनमध्ये किती वाढ झाली आहे
-Dogecoin – DOGE)– प्राइस: $0.1504, वाढ : +3.56%
-Cardano – ADA – प्राइस: $1.21, वाढ : +2.60%
-BNB – प्राइस: $455.61, वाढ : +2.38%
-Terra – LUNA – प्राइस: $116.11, वाढ : +0.94%
-Solana – SOL – प्राइस: $133.46, घसरण : -2.19%
-Avalanche – प्राइस: $96.31, घसरण : -1.04%
-Shiba Inu – प्राइस: $0.00002669, घसरण : -0.21%
-Polkadot – प्राइस: $22.86, घसरण : -0.40%
-XRP – प्राइस: $0.8275, घसरण : -0.70%

सर्वाधिक वाढ झालेले कॉईन्स
Metaverse ALL BEST ICO (METAALLBI), En-Tan-Mo (ETM), आणि BNB Chain ALL BEST ICO (BNBALLBI) हे गेल्या 24 तासांत सर्वाधिक वाढ झालेले कॉईन्स आहेत. Metaverse ALL BEST ICO (METAALLBI) मध्ये गेल्या 24 तासांत 522.58% वाढ झाली आहे. BNB Chain ALL BEST ICO (BNBALLBI)बद्दल बोलायचे झाले तर, या कॉईनने 457.04% वर झेप घेतली आहे. तिसरे सर्वात जास्त वाढ करणारे कॉईन En-Tan-Mo (ETM) आहे. यामध्ये 376.92% वाढ झाली आहे.

Leave a Comment