कोल्हापुरच्या श्रीमहालक्ष्मी च्या स्थापनेचा इतिहास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नऊ दिवस नऊ देवी | प्रणव पाटील

साडेतीन शक्तपीठांपैकी एक कसणारी करवीरनिवासिनी महालक्क्ष्मी च्या स्थानाला विशेष धार्मिक महत्त्व आहे.कोल्हापुरला जसा राजकीय इतिहास आहे तशाच अंगाने धार्मिक इतिहासही आहे.या लेखात आपण करवीरनिवासनीच्या स्थापने विषयी पहाणार आहे. Kolhapur Mahalaxmi

श्री महालक्क्ष्मी मंदिर परिसर हा अनेक उपमंदिर समुहाने गजबजलेला असला तरी मुख्य मंदिरात महालक्क्ष्मी सोबतच महाकाली आणि महासरस्वतींच्या ही मूर्ती असल्यामुळे तीन गर्भगृहांचे आणि वेगवेगळ्या तीन शिखरांमुळे त्रिकूट अथवा त्रैकूट प्रकारातील मंदिर म्हणून ओळखले गेले. यातील मुख्य गाभार्यात महालक्क्ष्मी ची मूर्ती आहे. या महालक्क्ष्मी ची स्थापना शिलाहार राजांनी केली असा समज आता पर्यंत होता कारण इ.स.१०५८ सालचा मारसिंह या शिलाहार राजाचा मिळालेला ताम्रपट ज्यात तो स्वतः ला “श्रीमन्महालक्ष्मीलब्धवरप्रसादादि” म्हणवून घेतो. Kolhapur Mahalaxmi

परंतु या पेक्षाही जूना ताम्रपट संजान या गावी(ठाणे) सापडला ज्याचा कालखंड इ.स.८७१ आहे.ज्यात शेवटच्या ओळींमधे राष्ट्रकूटराजा अमोघवर्ष प्रथम ज्याला वीरनारायण असे ही म्हटले जात होते त्याच्या विषयी म्हटले आहे.

“तेप्यैकैकमतर्प्पयान्किल महालक्क्ष्यै स्ववामांगुलिं
लोकोपद्रवशान्तये स्म दिशति श्रीवीरनारायणाः ||

अर्थ – राजा वीरनारयण (अमोघवर्ष) याने लोकांना होणारा उपद्रव शांत व्हावा यासाठी डाव्या हाताची करंगळी कापून श्रीमहालक्क्ष्मी ला समर्पित केली.

डॉ.अळतेकरांच्या मते या ताम्रपटातील उल्लेखानुसार लोकपद्रव शमवण्यासाठी अंगुली वाहिली होती , तो लोकोपद्रव म्हणजे साथीचा रोग होय .अभ्यासकांच्या मते सिंद राज्यांनी (शिलाहार) मुळ मंदिराचे पुनर्निमाण केले असावे. या मंदिर स्थापत्यावर चालुक्य आणि राष्ट्रकूटांच्या शैलीचा प्रभाव अढळतो कारण शिलाहार राजे आधी राष्ट्रकूट आणि नंतर चालुक्यांचे मांडलिक होते.

महालक्क्ष्मी च्या मूर्ती वर्णन –

गर्भगृहातील विराजमान असलेली मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती उभ्या राहीलेल्या स्थितीचा आहे.(स्थानक रुपात) एक मीटरची ही मूर्ती चतुर्भुज असून हाता मधे गदा, ढाल, पानपात्र, महाळुंग आहे. मुकुटावर सयोनिलिंगाची आकृती असून देवीच्या डावीकडे सिंह आहे.
अशा या करवीर नगरी विषयी करवीर महात्म्यात म्हटले आहे –
“वाराणस्याधिकं क्षेत्र करवीरं पुरं महत् ” म्हणजेच करवीर हे महान् नगर वाराणसीहून श्रेष्ठ आहे .

Pranav Patil

प्रणव पाटील
9850903005
(लेखक इतिहासाचे अभ्यासक असून आय.एल.एस महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत आहेत).

संदर्भ –
1) करवीरनिवासिनी श्रीमहालक्क्ष्मी – रा.चि.ढेरे
2) महाराष्ट्राराची चार दैवते – ग.ह.खरे
3) शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख – वा.वि.मिराशी
4) भारतीय संस्कृती कोष खंड ७

संदर्भ लेख –
1) श्री महालक्क्ष्मी मंदिर – डॉ.गो.बं.देगलूरकर
2) ताम्रपट आणि शिलालेखातून आलेली करवीरनिवासिनी – रुताताई ठाकूर
3) कोल्हापुरातील मंदिर वैभव – योगेश प्रभुदेसाई
4) शिलाहारांचे कोल्हापूरः एक शोध – डॉ.अरुणचंन्द्र पाठक

इतर महत्वाचे –

मातृदेवता सटवाई उर्फ षष्ठी! | नवरात्र विशेष #१

जैन देवता पद्मावती | नवरात्र विशेष #२

जखिण उर्फ यक्षिणी | नवरात्र विशेष #३

मदुराईची मीनाक्षी उर्फ मीना आम्मा | नवरात्र विशेष #5

Leave a Comment