ओमिक्रॉनचा धसका!! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटक, आणि गुजरात नंतर आता महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉनचा (Omicron) शिरकाव झाला असून कल्याण डोंबिवली मधील एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान या नंतर राज्याच्या चिंतेत भर पडली असून या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

ओमिक्रॉन संसर्गाचा जिल्ह्यात संभाव्य धोका वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये जिल्ह्यात ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजतापासून पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात जमावबंदी लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अरोरा यांनी ४ डिसेंबर रोजी जारी केला.

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यात 4 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून पासून शहरी व ग्रामिण भागात जमावबंदीचा आदेश लागू असेल. या काळात कोणत्याही प्रकारची रॅली, धरणे, आंदोलन, मोर्चा तसेच इतर कार्यक्रमांच्या आयोजनावर बंधी असेल.