‘या’ भारतीय महिला एथलीटवर 3 वर्षांची बंदी, पीटी उषाचा मोडला होता रेकॉर्ड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय खेळाडू कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. यामध्ये भारताची एथलीट धनलक्ष्मी सेकरला (Dhanalakshmi Sekar) 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. धनलक्ष्मी सेकरला (Dhanalakshmi Sekar) डोप टेस्ट मध्ये फेल झाल्यामुळे 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. वाडा 2022 यादीतील प्रतिबंधित मेटांडियनोन टेस्ट मध्ये ती पॉझिटिव्ह आढळली.

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये धनलक्ष्मीकडून (Dhanalakshmi Sekar) संपूर्ण देशाला अपेक्षा होती. पण गेम्स सुरु होण्याआधीच ती डोपिंग मध्ये अडकली. यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. ती संघाबाहेर गेल्यामुळे संघही कमकुवत झाला आहे. धनलक्ष्मी (Dhanalakshmi Sekar) भारताची 4×100 मीटर रिले टीमची सदस्य होती. धनलक्ष्मीने वर्ल्ड एथलॅटिक्स चॅम्पियनशिपसाठी क्वालिफाय केले होते.

मात्र व्हिसा समस्येमुळे ती संघासोबत गेली नव्हती. मागच्यावर्षी फेडरेशन कप मध्ये धनलक्ष्मीने (Dhanalakshmi Sekar) पीटी उषाचा 23 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला होता. धनलक्ष्मीची वर्ल्ड एथलॅटिक्स एथलीट इंटीग्रिटी यूनिटकडून टेस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये ती दोषी आढळली.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?