Monday, February 6, 2023

भारतातील मोठी फार्मा कंपनी Dr Reddy’s वर सायबर हल्ला, शेअर्स मध्ये झाली घसरण

- Advertisement -

मुंबई । फार्मा क्षेत्रातील दिग्गज डॉ. रेड्डीजच्या लॅबोरेटरीज (Dr. Reddy’s Laboratories) ने जगातील आपल्या सर्व डेटा सेंटर्सला आयसोलेट केले आहे. सायबर हल्ल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. डॉ. रेड्डीजच्या लॅबने स्टॉक एक्सचेंज (Stock Exchage) फाइलिंगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, सायबर हल्ल्यानंतर सर्व डेटा सेंटर्सला खबरदारी म्हणून आयसोलेट करण्यात आलेले आहेत जेणेकरून आवश्यक ती पावले उचलता येतील.

या प्रकरणात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीचे CIO मुकेश राठी म्हणाले, “येत्या 24 तासात सर्व सेवा सामान्य होतील असा आमचा अंदाज आहे. या घटनेचा आमच्या ऑपरेशन्स वर कोणताही परिणाम झालेला नाही.

- Advertisement -

एका मीडिया रिपोर्टमध्ये या सायबर हल्ल्याचा परिणाम भारत, ब्राझील, रशिया, युनायटेड किंगडम आणि अमेरिकेच्या प्लॅंटवर झाला आहे. अमेरिकेन वेळेत सायंकाळी 4.00-5.00 च्या सुमारास कंपनीच्या प्लॅंटवर सायबर हल्ला झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

शेअर्स मध्ये घसरण
डॉ. रेड्डीज लॅबवर झालेल्या या सायबर हल्ल्यानंतर कंपनीचे शेअर्स खाली आले. गुरुवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये 1.49 टक्क्यांची घसरण दिसून आली. कंपनी सध्या 4,971.70 शेअर्स (DRL Share Price) वर व्यापार करीत आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मध्येही 1.42 टक्क्यांची घसरण नोंदली गेली.

21 सप्टेंबर 2020 रोजी डॉ. रेड्डीजच्या लॅबचे शेअर्स प्रति आठवड्यात 52,514.65 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले. त्याच वेळी 19 मार्च 2020 रोजी ते 52 आठवड्यांच्या नीचांकावर पोहोचले. त्यावेळी कंपनीच्या एका शेअर्स ची किंमत 2,497.60 रुपये होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.