अंघोळ करताना Video Call, समोर नग्नावस्थेतील तरुणी अन् 14 लाखांचा गंडा

Cyber Crime Whatsapp Video Call
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल तंत्रज्ञान जस जस वाढलं आहे तस तस सायबर क्राईम (Cyber Crime) सारखे गुन्हेही वाढत चालले आहेत. ऑनलाईन पद्धतीने फसवणूक केल्याच्या घटना सातत्याने घडताना दिसतायत…. असाच एक प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे घडला आहे.. एका ६० वर्षाच्या वृद्धाला अंघोळ करताना व्हाट्सअप वर विडिओ कॉल आला… त्या विडिओ कॉल वर समोर नग्नावस्थेतील होती.. त्या तरुणीने व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करत वृद्धाला धमकी दिली आणि थोडे थोडके नव्हे तर तब्बल १४ लाख रुपये उकळले आहेत… या घटनेने छत्रपती संभाजीनगर येथे खळबळ उडाली आहे.. आंघोळ करताना विडिओ कॉल उचलणे वृद्धाच्या चांगलंच अंगलटी आलं. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, 23 मार्च रोजी वयस्कर पीडित व्यक्ती अंघोळ करत असताना त्याला एक व्हिडीओ कॉल आला. अनोळखी क्रमांकावरुन आलेला हा कॉल आहे त्या अवस्थेत उचलला.. आणि इथेच त्याचा घात झाला…. कारण कॉलवर समोरच्या बाजूला एक तरुणी नग्नावस्थेत होती. ही पीडित व्यक्ती अर्धनग्नावस्थेत असतानाच समोरच्या तरुणीने हा व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केला. नंतर अचानक हा कॉल बंद झाला. त्यानंतर वृद्धाला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार सुरु झाला…

थोड्याच वेळात वृद्ध नागरिकाला हेमंत मल्होत्रा नावाच्या व्यक्तीने कॉल केला. ‘तुमचा न्यूड व्हिडिओ व्हायरल झाला आहे, आमचे प्रमोद राठोड साहेब तुमच्याशी बोलतील’, असे त्याने सांगितले. काही वेळाने दुसऱ्या क्रमांकावरून आलेल्या कॉलवरील व्यक्तीने ‘आपण प्रमोद राठोड पोलिस बोलत असून, तुम्हाला जेलमध्ये टाकतो. जेलमध्ये जायचे नसेल तर सांगतो तेवढे पैसे दे अथवा तुरुंगात जाण्यासाठी तयार राहा, अशा शब्दांमध्ये धमकवण्यात आलं . त्यानंतर 23 मार्च ते 28 एप्रिल या एका महिन्याच्या कालावधीमध्ये आरोपींनी या पीडित वृद्ध व्यक्तीकडून तब्बल 14 लाख 66 हजार 773 रुपये उकळले..  तरीही पैसे मागणाऱ्याची हाव वाढतच गेली.. अखेर आपली फसवणूक झाल्याचे वृद्धाच्या लक्षात आलं.. त्यांनतर त्यांनी बदनामीची भीती बाजूला सारत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी आरोपी मोनी पाटील, हेमंत मल्होत्रा, प्रमोद राठोड, अरविंदसिंग आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद झाला.