Monday, March 20, 2023

सायकल मोर्चा : गॅस -पेट्रोल दरवाढी विरोधात सातारा काँग्रेस कमिटीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

काँग्रेसने गॅस दरवाढ विरोधात साताऱ्यात अनोखे शेणी आंदोलन केले. गेल्या काही काळापासून पेट्रोल डिझेल, तसेच घरगुती गॅसच्या वाढत्या दराने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल घेवून पेट्रोल- डिझेल तर शेणी घेवून घरगुती गॅसच्या दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या सात वर्षाच्या काळातील धोरणे आताच्या दरवाढीला कारणीभूत असून केंद्र सरकारच्या विरोधात सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली. तसेच महिला काँग्रेसने गॅस दरवाढ विरोधात चूल आणि शेणी (गोवऱ्या) घेऊन आंदोलन केले. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव, अजित पाटील- चिखलीकर, महिला जिल्हाध्यक्ष धनश्री महाडिक, युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांच्यासह कार्यकर्ते, महिला पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या भागातील सात वर्षाच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले तर दिवसेंदिवस प्रत्येक वस्तू महाग होत गेली आत्ता पेट्रोल डिझेल स्वयंपाकाचा गॅस सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे त्यामुळे सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चाचे आयोजन करून नरेंद्र मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला. करोडो रुपयांची लूट चालवली आहे मोदी सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली लोकांना उल्लू बनवला आहे. यावर सातारा काँग्रेस पदाधिकारी जिल्हाध्यक्ष यांच्यासमवेत सायकलवर येऊन मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला.

यावेळी विराज शिंदे म्हणाले, आमचे नेते राहूल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅली काढली आहे. आम्ही केंद्र सरकारला इशारा देत आहोत, पेट्रोल- डिझेल तसेच गॅस दरवाढीमुळे होरपळून गेलेला आहे. यापुढील काळातही काॅंग्रेस अशी आंदोलन करून मोदी सरकारला घालवणार आहे. केवळ काॅंग्रेस पक्षच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडू शकते. तसेच सातारा जिल्हा काॅंग्रेस व युवक काॅंग्रेसकडून या दरवाढीचा निषेध करत आहोत.