डबेवाल्याची फसवणूक : ऑनलाईन पैसे देण्याच्या बहाण्याने बॅंकेची माहिती घेवून गंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | वाई शहरातील एका डबे पुरवणाऱ्या व्यक्तीस एकाने आपण संरक्षण विभागातील अधिकारी असल्याचे भासवून डबेवाल्याची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. फसवणूक करणाऱ्याने संबंधित डबेवाल्याशी संपर्क साधून 20 डब्यांची मागणी केली. डब्याचे पैसे देण्यासाठी चोरट्याने त्यांच्याकडून केवायसी व बँक खात्याची माहिती मागून घेतली. यानंतर डबेवाल्याच्या खात्यातील पाच हजार रुपये वजा झाले. खात्यातून पैसे कट झाल्याचे डबेवाल्याच्या निदर्शनास आल्याने त्यांनी उर्वरित रक्कम दुसऱ्या खात्यावर टाकल्याने जास्त नुकसान टळले.

एका भामट्याने संरक्षण विभागातील अधिकारी असून वाई स्टैंड परिसरात जेवणाच्या डब्याबाबत चौकशी केली. संबंधित दुकानदाराने एका व्यक्तिचा फोन नंबर दिला. त्या व्यक्तीला त्या भामट्याने संपर्क साधून संरक्षण विभागातून बोलत असून पाचगणीत रोज 15 ते 20 डबे लागणार असल्याचे सांगितले.

डबेवाल्याला विश्वास बसावा यासाठी त्या भामट्याने मिलिटरी कॅन्टीनचे कार्ड डबेवाल्याला पाठवले. डब्याचे पैसे ऑनलाईन देण्यासाठी चालकाची केवायसी व बँक खाते माहिती मागून घेतली. रोज 20 डब्यांची ऑर्डर मिळते म्हणून त्या चालकाने सर्व माहिती दिली. त्या भामट्याला अपेक्षित माहिती मिळताच डबेवाल्याच्या खात्यावरील 5 हजार रूपयांना गंडा घातला.

Leave a Comment