महाराष्ट्राचं आराध्य दैवत – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आनंदोत्सव | चिन्मय साळवी

पुण्यात १२ महिने १८ काळ कधीही आलात तरी या बाप्पाच्या मंदिरात कायम गर्दी असते. पुण्याची ओळख बनलेल्या याबाप्पाचे विलोभनीय रूप भव्यदिव्य आरास हे पुण्यनगरीच्या गणेशोत्सवाचे सगळ्यात मोठे केंद्रबिंदू आहेत.

इतिहास : श्री. दगडूशेठ हलवाई हे मिठाईचे सुप्रसिद्ध व्यापारी होते, त्यांच्या मिठाईच्या गुणवत्तेमुळे त्यांना भरपूर लोकप्रियता व्यावसायिक यश मिळाले. सारे काही सुरळीत चालू असताना पुण्यात हाहाकार माजवणाऱ्या प्लेगच्या साथीत त्यांनी आपला एकुलता एक मुलगा गमावला. या धक्याने हलवाई दाम्पत्याला नैराश्याचा सामना करावा लागला.दगडूशेठ हलवाईंचे गुरुश्री माधवनाथमहाराजयांनी त्यांना गणपतीची भक्ती करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दगडूशेठ हलवाईंनी गणेश मंदीर बांधण्यास सुरुवात केली.१८९३ मध्ये यामंदिराचे बांधकाम पूर्ण झाले गणेशोत्सवाला थाटामाटात सुरुवात झाली. भाविकांची अपार श्रद्धा असलेल्याया मंडळाने नुकतीच गणेशोत्सवाची १२५वर्षे उत्साहात पूर्ण केली. भाविकांनी वर्षभरात बाप्पाचरणी अर्पण केलेल्या सोन्यापासून दागिने बनवले जातात.सोन्याचे दागिने एखाद्या राजाला शोभूनदिसेल असा साज यामुळे बाप्पाची मूर्तीनावाप्रमाणेचश्रीमंतभासते.

खासियत : दगडूशेठ आणि गर्दी हे समीकरण अनेक वर्षांपासून जुळून आले आहे. वर्षभर गणपतीची मंदिरात प्रतिष्ठापना केलेली असते तर गणेशोत्सवाच्या कालावधीत बाप्पा उत्सवमंडपात विराजमान होतात. दगडूशेठ हलवाई गणपती म्हणलं की आठवतात ते सोन्याचे दागिने. सोंडें पासून पायापर्यंत दागिन्यांनी नटलेल्या याबाप्पाचे रूप तेजोमय दिसते. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गेल्याच वर्षी मंडळाने गणपतीसाठी ४० किलो सोन्याचे दागिने घडवले आहेत. या गणपतीची फुलांनी सजलेल्या रथातून निघणारी प्रतिष्ठापना मिरवणुक लक्षावधी दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेल्या रथातून निघणारी विसर्जन मिरवणूक हे नयनरम्य सोहळे असतात. वर्षभर मंडळाकडून आंबा महोत्सव, शहाळे महोत्सव, मोगरा महोत्सव अशा विविध उत्सवांचे आयोजनकेले जाते त्याला अनुरूप आरासहीकेली जाते.

यंदा काय ? दरवर्षी भारतातील भव्यदिव्य मंदिरांची प्रतिकृती बनवण्याची परंपरा मंडळाने जपली आहे. यावर्षी मंडळाने तमिळनाडू, तंजावर येथील श्रीराजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती उभारलीआहे. प्रतिकृतीचा आकार ७५ बाय १०० फूट असून उंची ९० फूट आहे. लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी मनमोहक झुंबरांनी नटलेल्याया राजराजेश्वर मंदिरात गणेशपुराणातील प्रसंग चितारण्यात आले आहेत. यंदाही मंडळाने विद्यार्थी महिलांच्या सामुहिक अथर्वशीर्ष पठनाचे आयोजन केले आहे. १४ सप्टेंबरच्या पहाटे वातावरणात हा अथर्वशीर्षाचा जयघोष होईल. १४ सप्टेंबरच्या रात्री मंडळानेवारकरीगजराचेआयोजन केले आहे. त्यामुळे लाडक्या बाप्पासमोर लाडक्याविठुरायाचा गजर अनुभवायला मिळेल.

सामाजिक कार्य : श्रीमंत दगडूशेठहलवाई गणपती ट्रस्ट विविध सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. जय गणेश विद्यार्थी पालकत्व अभियानाद्वारे अनेक गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च केला जातो. जय गणेश जलसंवर्धन अभियान, जय गणेश रुग्णसेवा अभियान यांच्या मार्फतही मंडळ गरजूंना मदतीचा हात पुढे करते.

वैशिष्ट्यपूर्ण : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची मूर्ती हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. परंतु सध्या आपल्याला दिसणारा गणपती ही या मंडळाची तिसरी मूर्ती आहे. १८९३ साली कागदी लगदा शाडूची माती वापरून पहिली मूर्ती बनवण्यात आली. ही मूर्ती आजही अकरामारुती चौक मंडळाने जपून ठेवली आहे.मूर्तीला १२५ वर्ष पूर्ण झाल्याने गेल्या वर्षी तिचे काही प्रमाणात नूतनीकरण करण्यातआले. मंडळाने घडवलेली दुसरी मूर्ती कोंढव्याच्या मातोश्री वृद्धाश्रमात पाहण्यास मिळते. सध्या आपल्याला दिसणारी मूर्ती ज्येष्ठ मूर्तिकार नागेश शिल्पी यांनी घडवली आहे. सूर्यग्रहणाच्याकाळात घडवलेल्या या मूर्तीच्या पोटात मंत्रजपाच्या साक्षीने विधिवत श्रीयंत्र बसवण्यात आले आहे. त्यामुळे या तेजोमय मूर्तीला जीवत्व आले आहे अशी भाविकांची धारणा आहे.

Leave a Comment