हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंडी (Eggs) तर तुम्ही रोज खात असाल. वजन वाढायला आणि मसल वाढवण्यासाठी रोज किमान २ अंडी खावेत असं बोललं जातं. अंड्यांमध्ये सर्व आवश्यक अमिनो ॲसिड्स असतात, जे स्नायूंची वाढ, दुरुस्ती आणि शरीराच्या इतर कार्यांसाठी महत्त्वाचे आहेत. मात्र आता अंड्यामधून एक धोकादायक बॅक्टरीया पसरत असल्याचे समोर आल आहे. अमेरिकेत अशा प्रकारची घटना घडली असून 17 लाख अंडी दुकानदारांना परत पाठवण्यास सांगण्यात आलं आहे.
अमेरिकेतील सात राज्यांमधील कमीत कमी ७९ लोकांमध्ये अंड्यांशी संबंधित असलेला साल्मोनेलाचा एक प्रकार आढळला आहे. त्यापकी २१ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असं यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने म्हटले आहे.अॅरिझोना, कॅलिफोर्निया, इलिनॉय, इंडियाना, नेब्रास्का, न्यू मेक्सिको, नेवाडा, वॉशिंग्टन आणि वायोमिंग या राज्यांमध्ये अंड्यांमधून धोकादायक बॅक्टरीया पसरण्याचा धोका वाढताना दिसतोय. सरकारने लोकांना खबरदारी घेण्यास सांगितले असून संक्रमित अंडी फेकून द्यावीत किंवा ती दुकानात परत पाठवावीत असे आवाहन करण्यात आलंय. ग्राहकांनी अंड्यांच्या संपर्कात आलेल्या कोणत्याही पृष्ठभागाला धुवावे आणि निर्जंतुक करावे, असेही सांगण्यात आलं आहे.
काय आहेत साल्मोनेची लक्षणे?
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार साल्मोनेला हा एक हानिकारक सूक्ष्मजीव आहे. जो आपल्या शरीरात पोहोचल्यानंतर 12 ते 72 तासांच्या आत अतिसार, ताप, तीव्र उलट्या, निर्जलीकरण आणि पोटात पेटके यांसारखे आजार होतात. साल्मोनेला झाल्यानंतर आजारी पडणारे बहुतेक लोक एका आठवड्यात बरे होतात. लहान मुले, वृद्ध प्रौढ आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांमध्ये संसर्ग गंभीर असू शकतो, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. यापूर्वी अमेरिकेत टोमॅटो, कांदे आणि काकडीमध्ये विषाणू आढळून आले होते. आता अंड्यातही विषारी बॅक्टरीया सापडल्याने भूक लागल्यावर खायचं तरी काय? असा प्रश्न अमेरिकन नागरिकांना पडला असेल.