Sunday, May 28, 2023

लेकीचे शिर कापून, शिर हातात घेऊन पोलिस ठाण्याकडे चालत येणाऱ्या बापाकडे पाहून पोलिसही चक्रावले

लखनऊ | समाजामधे ऑनर किलिंग मोठ्या प्रमाणात घडताना पाहायला मिळते. यामध्ये प्रेमविवाह, प्रेमसंबंध आणि विवाहबाह्यसंबंध यामधून ऑनर किलिंग मोठ्या प्रमाणात घडून येत असल्याचे बोलले जाते. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यामध्ये घडली आहे. एक व्यक्ती त्याच्या हातामध्ये एका मुलीचे धडापासून वेगळे केलेले शीर घेऊन रस्त्याने चालत येत होता. तो व्यक्ती ते शिर घेऊन पोलीस स्टेशनकडे निघाला होता. पोलिसांनी त्याला अडविल्यानंतर त्याने सर्व माहिती अगदी शांततेत दिली. दिलेली माहिती ऐकून पोलिसही चक्रावून गेले होते.

कापलेले शीर हातात घेऊन जात असताना आजूबाजूच्या लोकांनी पाहिल्यावर घाबरून पोलीस स्टेशनला फोन केले. पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्याला थांबवून त्याबाबत विचारले असता, त्याने शांततेमध्ये पोलिसांना उत्तरे दिली. आरोपीचे नाव सर्वेश असे असून, त्याच्या हातातील शिर हे त्याच्या सतरा वर्षे मुलीचेच होते. मुलीचे एका तरुणासोबत प्रेम संबंध असल्याचे समजताच त्याने राग अनावर होऊन तिचे शीर कापले.

रस्त्यावरच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याशी प्रश्नोत्तरे केली. त्याला रस्त्यावर थोडा वेळ बसवले. त्याच्या हातातील शिर बाजूला ठेवले. आरोपीनेही कुठलाही विरोध केला नाही. आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अशी ह्रदयदावक घटना घडल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.