लसीकरण मोहिमेत दौलताबाद आरोग्य केंद्र सरस

जि.प. मुख्य कार्यकारी अधिका-यांनी व्यक्त केले समाधान

औरंगाबाद : कोविड लसीकरणाच्या मोहिमेत दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्र औरंगाबाद जिल्ह्यात सरस ठरले असून येथील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचा-यांचे कार्य बजावणा-या सेवकांप्रती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले यांनी समाधान व्यक्त केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या तिसगाव, वळदगाव, अब्दीमंडी, पंढरपूर, वडगाव कोल्हाटी बजाजनगर, या पाच उपकेंद्रांतून होणा-या प्रभावी लसीकरण मोहिमेने औरंगाबाद जिल्ह्यात सरस कामगिरी केली असून, प्रथम क्रमांकाचे श्रेय पटकाविले आहे.

दररोज १००० नागरिकांचे या आरोग्य केंद्रामार्फत कोविड लसीकरण होत असून व्यापक प्रमाणात होत असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाचे तसेच दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्राची धुरा सांभाळणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम बामणे, डॉ. प्रशांत दाते, तसेच आरोग्य सेवकांच्या कार्याचे कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले आहे.

You might also like