व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

David Miller : धडाकेबाज खेळी करत गुजरातला अंतिम पोहोचविणाऱ्या मिलरने मागितली RR ची माफी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । David Miller : कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर काल (मंगळवारी) गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात IPL 2022 चा पहिला क्वालिफायर खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्स कडून राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव झाला. यावेळी साऊथ आफ्रिकेचा डेव्हिड मिलर हा गुजरातच्या विजयाचा शिल्पकार ठरला. 38 चेंडूत 68 धावांची तुफानी खेळी करत मिलरने राजस्थान रॉयल्सच्या तोंडाचा घास पळविला. आपली ही खेळी त्याने 3 चौकार आणि 5 षटकारांनी सजवली.

David Miller, Unsold to Match Winner : 'मॅचविनर' डेव्हिड मिलर... लिलावात  आधी UNOSLD नंतर बोलीसाठी स्पर्धा! | David Miller went unsold in first round  if IPL 2022 Mega Auction Later on purchased

हे लक्षात घ्या कि, 2020 आणि 2021 च्या हंगामात David Miller हा राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. मात्र त्याला तिथे फारशी संधी मिळाली नाही. जिथे त्याला बऱ्याच सामन्यांमध्ये बेंचवरच काढावे लागले होते. आयपीएलच्या या हंगामात तो गुजरात टायटन्स संघाकडून मैदानात उतरला. डेव्हिड मिलरला गुजरात टायटन्सने 3 कोटी रुपयांना विकत घेतले. आता गुजरातला अंतिम फेरीत पोहोचवल्यानंतर मिलरने आपल्या जुन्या संघाची माफी मागितली आहे. त्याने एक ट्विट करत राजस्थान रॉयल्सची माफी मागितली आहे.

Twitter Reactions: Killer Miller demolishes RR to power GT into the final

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या. हे टार्गेट गुजरातने 19.3 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले. या सामन्यांत David Miller ला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविले गेले. दक्षिण आफ्रिकेच्या या धडाकेबाज फलंदाजाने राजस्थानच्या गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळविले. एकही गोलंदाज त्याच्यापासून वाचू शकला नाही. प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या अखेरच्या षटकात तर त्याने सलग तीन षटकार खेचत गुजरातला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला.

मात्र यानंतर David Miller ने एक ट्विटर वर ‘सॉरी रॉयल फॅमिली’ असे म्हणत राजस्थान रॉयल्स माफी मागितली. डेव्हिड मिलरचे हे ट्विटही अगदी काही वेळेतच व्हायरल झाले. गुजरातला अंतिम फेरीत पोहोचवण्यात मिलरचा महत्त्वाचा वाटा आहे.

सामन्यानंतर, मिलर म्हणाला की,” गुजरात टायटन्समध्ये संधी मिळाल्याने त्याला या हंगामात चांगली कामगिरी करण्यात मदत झाली आहे.” मिलर पुढे म्हणाला की,” मला एक भूमिका देण्यात आली आहे, मला सुरुवातीपासूनच खूप सपोर्ट मिळत होता. मी माझ्या या भूमिकेचा आनंद घेत आहे, मी अनेक वर्षांपासून असाच खेळत आहे.

David Miller finishes off Rajasthan Royals, sends Gujarat Titans into IPL  final | Cricket - Hindustan Times

IPL 2022 च्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.iplt20.com/

हे पण वाचा : 

RBI : खुशखबर !!! आता घर दुरुस्त करण्यासाठी देखील मिळणार 10 लाखांपर्यंतचे कर्ज

Honda कडून लवकरच लॉन्च केली जाणार दुसरी हायब्रिड कार !!! नवीन फीचर्सविषयी जाणून घ्या

Share Market : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 250% रिटर्न !!!

Gold Price Today : सोन्यामध्ये घसरण तर चांदीमध्ये किंचित वाढ

2000 Note : खरंच… 2000 रुपयांची नोट बंद झाली ??? RBI काय म्हणाली ते पहा