व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

दोघा भावांचे दिवसाढवळ्या विवाहितेसोबत ‘हे’ घृणास्पद कृत्य

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये अनोळखी क्रमांकावरून एक मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री वाढली. याच मैत्रीतून पुढे प्रेमाच्या भावनेतून तरुणीच्या आलेल्या मिस कॉलला ग्रीन सिग्नल समजून आरोपी तरुण आपल्या भावासोबत तरुणीच्या घरी गेला. मात्र, तिने तुमचा गैरसमज झाल्याचे सांगून त्यांना घरून जाण्यास सांगितले.

तेव्हा या आरोपी तरुणाने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape) केला. तर त्याच्या भावाने या बलात्काराचा (Rape) व्हिडिओ आपल्या शूट केला. यानंतर पीडितेने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी तरुणांना अटक केली आहे. या साठी पोलिसांनी 200 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत.

अनिल चव्हाण आणि नीलेश चव्हाण अशी या आरोपी तरुणाची नावे आहेत. ते विलेपार्ले येथील रहिवासी आहेत. पीडित तरुणी धारावी परिसरात सासरच्या मंडळींसोबत राहते. गेल्या आठवड्यात ही घटना घडली. तरुणी घरात झोपली असताना, तिचे सासरे दरवाजा न लावता घराबाहेर पडले. त्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास चव्हाण भावांनी चाकूचा धाक दाखवून त्या विवाहितेवर बलात्कार (Rape) केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :

तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ आहे; फडणवीसांच्या सभेनंतर राऊतांचे ट्विट

उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब