कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मानवी चाचणीस सीरम इंस्टीट्यूटला मिळाली मंजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय औषध महानियंत्रण (DGCI) ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीने संशोधित केलेल्या कोरोना वायरस लसीची देशभरात चर्चा सुरु आहे. याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मानवी चाचणीस सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीया (SII) ला मंजुरी देण्यात आली आहे . कोरोना संदर्भातील विषेतज्ञ समितीने चर्चा केल्यानंतर औषध महानियंत्रक डॉ. वी.जी. सोमानी यांनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीयाला रविवारी रात्री उशीरा ही मंजुरी दिली.

कंपनीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलआधी सुरक्षे संदर्भातील माहिती केंद्रीय औषध मानक नियंत्रण संगठन (CDSCO) जवळ जमा करावी लागणार आहे. याचे मुल्यांकन माहिती सुरक्षा निरीक्षण बोर्ड ( DSMB) करणार आहे. ऑक्सफोर्डने विकसित केलेल्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे परिक्षण ब्रिटनमध्ये सुरु आहे. तिसऱ्या टप्प्याचे परीक्षण ब्राझीलमध्ये आणि पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे परीक्षण दक्षिण आफ्रीकेत सुरु आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या परिक्षणासाठी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडीयाच्या मागणीवर विचार करण्यात आलाय. एसईसीने २८ जुलैला यासंदर्भात आणखी माहिती मागवली होती. तसेच प्रोटोकॉलमनुसार संशोधन करण्यास सांगितले होते. एसआयआयने संशोधित प्रस्ताव बुधवारी जमा केला. क्लिनिकल ट्रायकसाठी ठिकाणांची निवड पूर्ण देशातून केली जावी असा सल्ला देण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून देशात रोज ५० हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना, दुसरीकडे कोरोनाग्रस्त बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासात सर्वाधिक ५१ हजार २५ ५रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एका दिवसातील ही सर्वाधिक आकडेवारी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment