मृतदेहाशेजारीच कोरोनाबाधित महिलांवर उपचार बीडमधील धक्कादायक प्रकार

बीड : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये कोरोना रुग्णांच्या मृतदेहाची मोठ्या प्रमाणात हेळसांड झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. बीडमधील जिल्हा रुग्णालयात एक मृतदेह २२ तास पडून होता. त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

काय आहे प्रकार
बीडच्या जिल्हा रुग्णालयात गुरुवारी रात्री एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह २० तास कोविड वार्डातच पडून होता. एवढेच नाही तर त्या मृतदेहाशेजारी दोन महिलांवर उपचारदेखील सुरू होते. हा धक्कादायक प्रकार जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग हॉस्टेलमधील कोविड वार्डमध्ये घडला आहे. या सर्व प्रकारामुळे कोविड वार्डात उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

२० ते २२ तास तो मृतदेह तसाच पडून राहिल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तो बाहेर काढला आहे. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तो होऊ शकला नाही. हा प्रकार उघडकीस आपल्याने नातेवाईक आणि रुग्णांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

You might also like