दोघांवर नागपूरात ऊपचार सूरू..
अमरावती प्रतिनिधी
उन्हाळा सुरु होण्याच्या सुरुवातीलाच अमरावतीमध्ये स्वाईन फ्ल्यू ने डोकं वर काढलेलं आहे. या निमित्ताने जिल्ह्याची आरोग्य सेवा आजारी असलेलं दिसत आहे. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात शिरजगाव कसबा येथे अनेक रोगांचे आजार पसरले असून त्यामध्ये गालफुगी, डेंगू मलेरिया, हिवताप, स्वाइन फ्लू, टायफाईड यासारखे आजारांनी डोके वर काढले आहे. नागपूर येथे खाजगी रुग्णालयात काही दिवसापूर्वी संशयित स्वाइन फ्लू रुग्ण पॉझिटिव निघाल्याने त्याच्यावर उपचार करत असतानाच त्याची प्राणज्योत मावळली असल्याचे समजले.
विवेक मेगजे ( वय 48 ) असं मृत्यू झालेल्या रुग्णाचं नाव असून गावात भितीचे वातावरण आहे. तसेच हा आजार संसर्गजन्य रोग असल्याने त्याबद्दल अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. गावामध्ये अत्यंत भीतीच्या वातावरणात आज या रुग्णावर अंत्यविधी करण्यात आला.
या मृत्यूची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून डॉक्टर एस सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात रोग निर्मुलन चम्मुने या भागातील पाहणी करुन संबंधित कुटुंबाला ला भेट दिली आहे. नागरिकांनी गावातील कुटुंबाना स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे व कोणत्याही आजाराला सामान्य न समजता डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार घ्यावा असे आव्हान केले आहेत.