व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक ! ऑक्सिजन अभावी डॉक्टर सहित 8 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील कोरोनाची परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. काही ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाहीये तर काही ठिकाणी औषध उपलब्ध होत नाहीत अशा स्थिती नवी दिल्ली येथे बत्रा रुग्णालयातून एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. या रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी डॉक्टरसह आठ जणांचा जीव गेला आहे. रुग्णालयाने ही माहिती दिल्ली हायकोर्टाला दिली आहे.

कोरोनाच्या एकंदर परिस्थितीवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी भद्रा रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या रुग्णालयातील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. ऑक्सिजनच्या आभावमुळे एका डॉक्टर सह 8 रुग्णांचा जीव गेल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली.

याबाबत बोलताना कोर्टाने स्पष्ट केले की दिल्ली सरकारला ऑक्सिजन, मेडिसिन आणि बेड उपलब्धतेबाबत अनेक प्रश्न विचारले. संकटात सरकार लष्कराची मदत का घेत नाही? असा सवाल कोर्टाने केला आहे. आर्मी कडे त्यांची संसाधन असतील आपली सेना निश्चितच ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी दुसरा चांगला पर्याय मार्ग देऊ शकतात. आम्ही तीन दिवस त्यांची मदत घ्या म्हणून सांगत आहोत पण तुम्ही संकोच का करत आहात? बिना ऑक्सिजन बेडचा फायदा नाही असे सांगण्याऐवजी सैन्याची मदत घेण्याचा विचार करावा असं कोर्टाने सांगितले.

मात्र याच वेळी दिल्ली सरकारच्या वकिलांनी कोर्टात उत्तर देताना सांगितलं आमची मदत करण्यासाठी तयार असलेल्या प्रत्येकाकडून आम्ही मदत घेऊ लष्कराकडून मदत देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर विचार केले जात आहेत. त्यावेळी त्यांना विचार करण्याऐवजी थेट मदत मागण्यास सांगितलं आहे.