डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गरोदर महिलेचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | येथील चिकलठाणा परिसरातील नामांकित इंडोवर्ड हॉस्पिटलमधील डॉ. पळसकर यांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. पूजा सुनील पालोदकर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे महिलेच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी वैद्यकीय तपासणी अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलीस सूत्रांच्या वतीने सांगण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, मृत पावलेली महिला गरोदर असल्याने तिच्या नातेवाईकांनी तपासणीसाठी इंडोवर्ड हॉस्पिटलमध्ये आणले होते. मात्र तपासणीदरम्यान तिचा अचानक मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त झाले. त्यांंनी डॉक्टरांना मृत्यूचे कारण विचारले, मात्र डॉक्टर काहीच न बोलता तेथून निघून गेले. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी थेट सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांकडे डॉक्टर तसेच हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याबाबत पोलीस कर्मचारीदेखील गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत होते, असे मृत महिलेच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. मात्र महिलेचे वैद्यकीय रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर काही चुकीचे असेल तर इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी सिडको पोलीस ठाण्याचे निशिकांत भुजबळ तसेच विठ्ठल पोटे यांनी नातेवाईकांना समजावून सांगत सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच वैद्यकीय अहवाल हाती येताच दोषी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यांची गय केली जाणार नाही, असे सांगितले. या घटनेनंतर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास पोलीस करीत असल्याचे सांगण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

Leave a Comment